S M L

गोलचा बादशाह 'हुकला', मेस्सीचा आंतराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

Sachin Salve | Updated On: Jun 27, 2016 02:49 PM IST

गोलचा बादशाह 'हुकला', मेस्सीचा आंतराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

27 जून : फुटबॉल जगतात पाचवेळा सर्वोत्तम फुटबॉलपटूचा मान मिळवणार्‍या लिओनेल मेस्सीने आंतराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा केलाय. कोपा अमेरिकेच्या फायलनमध्ये आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकलो नाही याचं शल्य मनाशी बाळगूण तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. मेस्सीच्या या घोषणेमुळे अवघ्या जगातील त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरलीये.

लिओनेल मेस्सी...हे नाव पुढे आलं तर साहजिक गोलचा बादशाह म्हणून मेस्सीचा उल्लेख केला जातो. पण कोपा अमेरिकेच्या फायलनलमध्ये मेस्सीची जादू फिकी पडली. अटीतटीच्या या सामन्यात पॅनल्टी शुटआऊटची वेळ आली तेव्हा सगळ्यांच्या नजरा मेस्सीवर खिळल्या. आणि ते साहजिकच होते. कारण, आतापर्यंत मेस्सीने अर्जेंटिनाकडून सर्वाधिक 55 गोल्स केले आहे. प्रचंड दबावाखाली असलेल्या मेस्सीने पॅनल्टी शुटआऊटसाठी पुढे आला...चाहत्यांची एकच धाकधूक वाढली...आणि मेस्सीने पॅनल्टी शूट केलं पण गोल काही होऊ शकला नाही...सर्वत्र एकच शांतता पसरली. अर्जेंटिनाच्या चाहत्यांवर एकच शोककळा पसरली. खुद्द मेस्सी आपल्याकडून गोल होऊ न शकल्याने हताश झाला. त्याला तिथेच रडू कोसळलं.

मेस्सीकडून गोल न झाल्यामुळे चिलीच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं. फायनल संपल्यानंतर काही मिनिटांमध्येच त्यानं निवृत्तीची घोषणा केली. याआधीही 2014 च्या वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाला जर्मनीकरुन पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यावेळी सुद्धा मेस्सीला गोल करण्यात अपयश आलं होतं.

सर्वाधिक गोल करण्याचा किताब नावी असून सुद्धा निर्णायक क्षणी मेस्सी आपल्या संघाला विजय मिळवून देऊ न शकल्यामुळे निवृत्तीची घोषणा केली. मेस्सीच्या या घोषणेमुळे त्याच्या चाहत्यांवर दुखाचा डोंगर कोसळला. सोशल मीडियावर 'आय लव्ह मेस्सी' नावाने पोस्ट झळकत आहे. त्याच्यावर टीकाही होत आहे आणि त्याच्या जाण्याचं दु:ख चाहते व्यक्त करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 27, 2016 02:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close