S M L

नांदेडच्या सचखंड गुरूद्वाराला लाभली नवी झळाळी

13 ऑक्टोबर, नांदेड - गुरू-ता-गद्दी सोहळ्यामुळे नांदेडमधल्या सचखंड गुरुद्वाराला झळाळी प्राप्त झाली आहे. गुरू गोविंद सिंग यांनी ज्या ठिकाणी देहत्याग केला,त्याच ठिकाणी महाराजा रणजित सिंग यांनी गुरूद्वारा बांधून घेतला आहे. संपूर्ण सोन्याचा घुमट हे या सुवर्णमंदिराचं वैशिष्ट्य आहे.शिखांची दक्षिण काशी म्हणजे नांदेडचा सचखंड हा गुरुद्वारा एक मण सोनं देऊन महाराजा रणजितसिंगांनी तो बांधून घेतला, असं सांगतात. त्यासाठी खास पंजाबमधन कारागीर आणण्यात आले. 1834 ते 1840 दरम्यान झालेल्या गुरूद्वाराच्या बांधकामात अतिशय सुरेख कोरीव कामाचा वापर करण्यात आला आहे. दसरा, दिवाळीला हा गुरूद्वारा दुधाने धुतला जातो. त्यासाठी अनेक शीख बांधव सेवा देतात.गुद्वारा परिसर विकासासाठी महाराष्ट्र सरकारने 35 कोटींचं विशेष पॅकेज दिलं आहे. तसंच, गुरुेद्वारा कमिटीनेही वेगळं पॅकेज ठेवलं आहे.गुरू-ता-गद्दीच्या कामांमुळे, परिसराचा विकास होत आहे, तसंच सचखंड गुरूद्वार्‍यालाही अनोखी झळाळी प्राप्त झाली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2008 04:14 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 13, 2008 04:14 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close