S M L

आशिष शेलार 'शकुनीमामा',शिवसैनिकांचं मुंबईत आंदोलन

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2016 12:52 PM IST

आशिष शेलार 'शकुनीमामा',शिवसैनिकांचं मुंबईत आंदोलन

shelar_vs_senaमुंबई - 28 जून : शिवसेना भाजपमध्ये शोलेगिरीचा दुसरा अंक सुरू झालाय. शिवसैनिकांनी आता भाजप नेते आशिष शेलारांना टार्गेट केलंय. शिवसैनिकांनी चर्चगेट स्टेशनबाहेर आशिष शेलारांविरोधात आंदोलन करीत त्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला.

शिवसैनिकांनी आशिष शेलारांना शकुनीमामाची उपमा देत आंदोलन केलं. युतीमध्ये आशिष शेलार हे शकुनीमामाची भूमिका पार पाडत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केलाय. शिवसेना भाजपमध्ये शोलेगिरी झाल्यानंतर भाजप नेत्यांनी थोडी नमती भूमिका घेतली होती. मात्र, शेलार यांनी तुमचे पुतळे आणि सामना वृत्तपत्र जाळू असा इशारा दिल्यामुले शिवसैनिक पुन्हा आक्रमक झालेत. शिवसैनिकांनी अमित शहांना कल्लूमामा तर माधव भांडारींना सांबा अशी उपमा दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2016 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close