S M L

ठाण्यात एटीएम मशिनला कॅश पुरवणार्‍या कंपनीवर दरोडा, 16 कोटींची लूट

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2016 04:48 PM IST

ठाण्यात एटीएम मशिनला कॅश पुरवणार्‍या कंपनीवर दरोडा, 16 कोटींची लूट

ठाणे - 28 जून : मुंबईत आतापर्यंतचा सर्वात मोठ्या दरोड्याची घटना ठाण्यात घडलीये. ठाण्यातल्या तीन हात नाका भागात असलेल्या चेकमेट या खासगी कंपनीवर पहाटे दरोडा टाकण्यात आला. दरोडेखोरांनी तब्बल 16 कोटी 16 लाख रुपये लंपास केले. तर चोरी झालेल्या घटनास्थली अंदाजे 15 ते 16 कोटी रुपये शिल्लक मिळाले आहेत.

ठाण्यात एटीएममध्ये कॅश भरणार्‍या चेकमेट कंपनीच्या ऑफिसवर दरोडा टाकण्यात आलाय.पहाटे साडे तीनच्या सुमारास हा दरोडा टाकण्यात आला. पाच सशस्त्र दरोडेखोरांनी ऑफिसमध्ये दरोडा टाकला. त्यांनी ऑफिसमध्ये तैनात असलेल्या दोन सुरक्षा रक्षकांना पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवून लूट केली. या ऑफिसमध्ये लावण्यात आलेले सीसीटीव्हीचे रेकॉर्डरही पळवून नेलेत. ठाण्यातल्या मेंटल हॉस्पिटलजवळ चेकमेट या कंपनीचं ऑफिस आहे.. हायवेजवळ असलेल्या या भागातील चोरीनंतर चोरट्याने पहाटे मोकळा रस्ता मिळाल्यामुळे चोरटे कोठे कोठे जाऊ शकतात याचा शोध ठाणे पोलीस आणि गुन्हे शाखा ही करत आहे. या भागातील सर्व रस्त्यांवरील सीसीटीव्ही तपासणे सुरू असून दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांच्या वेगवेगळ्या टीम्स तपास करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2016 01:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close