S M L

बीड जिल्हा बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी पाच संचालक पोलिसांच्या ताब्यात

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2016 02:05 PM IST

बीड जिल्हा बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी पाच संचालक पोलिसांच्या ताब्यात

बीड - 28 जून : बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्ज घोटाळा प्रकरणी एसआयटीने 5 जणांना ताब्यात घेतलंय. आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. बँकेचे माजी संचालक, कर्जदार अशा 5 जणांना अटक करण्यात आलीये.

बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेतल्या कोट्यवधींच्या कर्ज घोटाळ्या प्रकरणी एसआयटीने आपली चौकशी पूर्ण केलीये. आज या प्रकरणी विशेष कोर्टात आरोपपत्र दाखल केलं जातंय. एसआयटीने या घोटाळ्यातल्या 4 वेगवेगळ्या प्रकरणात 105 जणांना हजर राहण्यासाठी नोटीस बजावलीये.

धनंजय मुंडे, खासदार रजनी पाटील, आमदार अमरसिंह पंडित यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. 2011-12 साली बँकेतून बेकायदा 141 कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. या प्रकरणी आजपर्यंत 131 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात आरोपी असलेल्या नेत्यांवर पोलीस रात्रभर नजर ठेवून आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2016 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close