S M L

अमरावतीत एकाच कुटुंबातील सहा जणांची आत्महत्या

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2016 05:52 PM IST

killingअमरावती - 28 जून : जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील काठीपुरा भागात राहणार्‍या एकाच कुटुंबातील सहा जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या करणार्‍यांमध्ये 4 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे.

अंजनगाव सुर्जी येथील काठीपुरा भागात एकाच कुटुंबातील सहा जणांनी आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी 2 चा सुमारास उघडकीस आली आहे. प्रफुल्ल नारायण चव्हाण असं कुटुंब प्रमुखाचं नाव आहे. त्यांचा किराणा दुकानाचा व्यवसाय होता अशी प्राथमिक माहिती समोर हाती आलीये. आत्महत्या करणार्‍यांमध्ये प्रफुल्ल नारायण चव्हाण (48), विवेक नारायण चव्हाण (40), लक्ष्मी नारायण चव्हाण (50) मंगला नारायण चव्हाण (52) आणि कामिनी बारड वय 29 वर्षं, रोशनी बारड वय 26 वर्षं यांनी आत्महत्या केलेली आहे. आत्महत्या का केली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2016 05:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close