S M L

शेतकर्‍यांना थेट ग्राहकांना विकता येईल शेतमाल !

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2016 07:29 PM IST

शेतकर्‍यांना थेट ग्राहकांना विकता येईल शेतमाल !

28 जून : आता शेतकर्‍यांना आपला शेतीमाल थेट बाजारात विकता येणार आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं असून लवकरच याबद्दलचा अध्यादेश काढण्यात येणार आहे.

कृषी उत्पन्न बाजार समिती व्यतिरिक्त मुक्त बाजारपेठेत भाजा आणि फळे शेतकर्‍यांना विक्री तत्वतः मंजुरी देण्यात देण्यात आहे. याची अंमलबजावणी कशी करायची हे ठरवण्यासाठी एक उपसमिती नेमण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती असेल. यामध्ये पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, राम शिंदे, प्रविण पोटे आणि सुभाष देसाई हे सदस्य असतील. या निर्णयामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्याचा कुठलाही विचार नाही. पण शेतकर्‍यांना याचा फायदा होणार आहे.

2 जुलैला या उपसमितीची बैठक होईल. यामध्ये अध्यादेशाचा निर्णय होईल. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना स्वतःचा शेतमाल थेट ग्राहकांना विकण्याची मिळणार मुभा मिळणार आहे. त्यामुळे मध्यस्थांची साखळी संपुष्टात येणार आहे. सध्याच्या घडीला मध्यस्थांच्या साखळीमुळे भाजीपाला आणि फळांच्या किमती अव्वाच्या सवा झाल्याचे दिसतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2016 07:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close