S M L

शोएबविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा

4 एप्रिलहैदराबादमध्ये सानियाच्या घरी लग्नाच्या तयारीत गुंग असणार्‍या दुल्हेराजा शोएब मलिकच्या विरोधात आज फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला. त्याची पहिली पत्नी असल्याचा दावा करणार्‍या आयेशा हिच्या वडिलांनी हैदराबादमधील बंजारा पोलीस स्टेशनमध्ये याबाबत एफआयआर दाखल केला आहे.सानियाशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन शोएब मलिकने आपली फसवणूक केली असल्याचा आरोप आयेशा सिद्दीकीने केला आहे. या प्रकरणामुळे आपल्याला प्रचंड मानसिक धक्का बसल्याचे तिने म्हटले आहे. तसेच शोएबला आता कोर्टात खेचण्याचा निश्चयच तिने केला आहे. याअगोदरच तिने शोएबवर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. तर फोटो एका मुलीचा आणि निकाह भलत्याच मुलीशी लावूनआपली फसवणूक झाली. त्यामुळे घटस्फोट देण्याची गरज नाही, असे शोएबने म्हटले आहे.शोएबने आज सकाळीच सानियाच्या घराबाहेर झालेल्या पत्रकार परिषदेत, आपण 15 तारखेला सोनियाशी निकाह करत असल्याचे सांगितले. यासोबतच सानिया भारतीय टीमकडूनच खेळेल, अशी ग्वाहीही त्याने दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 4, 2010 02:41 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 4, 2010 02:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close