S M L

शोएबची चौकशी, पासपोर्ट जप्त

5 एप्रिलनिकाहसाठी हैदराबादमध्ये दाखल झालेला पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक याच्यासमोरील अडचणी वाढत चालल्या आहेत. पोलिसांनी आज शोएबचा पासपोर्ट जप्त केला आहे. शोएबशी यापूर्वी निकाह झाल्याचा दावा करणार्‍या आयेशा सिद्दीकीने शोएबविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार पोलिसांनी आज सकाळीच सानियाच्या घरी जाऊन शोएबची चौकशी केली. दीड तास चाललेल्या चौकशीदरम्यान, शोएबने पूर्ण सहकार्य केले. तसेच आयेशा सिद्दीकीची चौकशी करण्यात आली. आम्ही पुरावे जमा करत आहोत. पण लगेचच काहीही सांगणे चुकीचे ठरेल, असे हैदराबादच्या पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. शोएबविरुद्ध आयशाने फसवणुकीची तसेच हुंड्यासाठी छळवणुकीची तक्रार दाखल केली आहे. हैदराबाद पोलिसांनी शोएबला यापूर्वीच भारत सोडायला मनाई केली आहे. एसीपी रवींद्र रेड्डी यांच्या टीमने ही चौकशी केली आहे. त्यात पोलिसांनी फोनवरून आयेशाशी तुझे लग्न झाले, हे खरे आहे का ? आयेशाने सादर केलेला निकाहनामा खरा आहे का ? लग्नानंतर आयेशाला धोका दिला का ? तसेच लग्नानंतर तू आयेशाचा छळ केलास का? असे प्रश्न पोलिसांनी शोएबला विचारले. आयेशाच्या तक्रारींवरून आता शोएब मलिकवर, हैदराबादच्या बंजारा हिल्स पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला आहे. त्याच्यावर हुंड्यासाठी छळ केल्याच्या आरोपाखाली 498 कलम लावण्यात आले आहे. तर आयपीसी 420नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 506 कलमानुसार धमकावणे किंवा धाक दाखवणे, यासाठीही कारवाई करण्यात येत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2010 08:45 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2010 08:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close