S M L

अंधेरीत मेडिकल दुकानाला भीषण आग, 5 चिमुरड्यांसह 9 जणांचा मृत्यू

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2016 01:49 PM IST

अंधेरीत मेडिकल दुकानाला भीषण आग, 5 चिमुरड्यांसह 9 जणांचा मृत्यू

 मुंबई, 30 जून : अंधेरीमध्ये जुहू गल्लीत आज सकाळी 'वफा'औषध दुकानाला आग लागली. या आगीत एकाच कुटुंबातल्या 9 जणांचा मृत्यू झाला. या आगीमध्ये 5 लहान मुलं गुदमरून मरण पावल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

जुहू गल्लीत झोपडपट्टीत अत्यंत दाटीवाटीच्या ठिकाणी 'वफा' औषध दुकान आहे. मेडिकल स्टोरच्या वर पोटमाळ्याला लागून एसी बसवला होता. याच एसीचा काँप्रेसर जळाल्यामुळे आग भडकली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्तं केला जातोय.

आग लागल्यावर पोटमाळ्याला रहाणर्‍या कामगारांना बाहेर निघण्यासाठी एकच शिडी होती जी मेडिकल स्टोरमधुनच जात होती. त्यामुळे आगीत सापडलेल्या पोटमाळ्यावर राहणार्‍या कामगारांना आपला जीव वाचवण्यासाठी मार्गच सापडला नाही.

या आगीमुळे पुन्हा एकदा आग प्रतिबंधक उपायांची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्याचंच पुढे आलंय. याला जबाबदार जसे दुकानदार आहेत, तसंच उपायांची अंमलबजावणी होतेय की नाही याची पाहणी करण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे.

अंधेरी आगीतल्या मृतांची नावं

सबुरीया मोझीन खान (52 वर्ष)

सिद्दीक खान (35 वर्ष)

राबील खान (28 वर्ष)

मोझेल खान (8 वर्ष)

उन्हीया खान (5 वर्ष)

अलीझा खान (4 वर्ष)

तुब्बा खान (8 वर्ष)

अल्ताज खान (3 महिने)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2016 01:49 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close