S M L

ठाण्यात मनसेला धक्का, 2 नगरसेवकांचा सेनेत प्रवेश

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2016 03:17 PM IST

ठाण्यात मनसेला धक्का, 2 नगरसेवकांचा सेनेत प्रवेश

ठाणे - 30 जून : ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गडाला खिंडार पडलंय. मनसेच्या दोन नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलाय. सुनिता गणेश मुंडे, शैलेश पाटील या दोन मनसे सैनिकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर सेनेत प्रवेश केला. त्यांच्यासोबत आरपीआयचे ठाणे जिल्हाउपाध्यक्ष सुखदेव पाटील यांनीही मनसेत प्रवेश केलाय. यावेळी सेनेचे एमएसआरडीसी मंत्री आणि ठाणे जिल्हासंपर्क प्रमुख एकनाथ शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार सुभाष भोईर यांच्या उपस्थिती होते.  मनसेच्या या दोन नगरसेवकांना सेनेत प्रवेशामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2016 02:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close