S M L

ठाणे 'चेकमेट' दरोडा प्रकरणी 7 जणांना अटक

Sachin Salve | Updated On: Jun 30, 2016 05:22 PM IST

ठाणे 'चेकमेट' दरोडा प्रकरणी 7 जणांना अटक

ठाणे - 30 जून : ठाण्यातल्या चेकमेट कंपनीच्या दरोड्याप्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना नाशिकमधून अटक केलीये. तर इतर 10 आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी सातपूर भागात कोंबिंग ऑपरेशन सुरू केलंय. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी साडे सात कोटी रुपयांची रोकड हस्तगत केलीये. नाशिकच्या हॉटेल अयोध्यामधून पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीये. अटक केलेल्या आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.thane daroda3

ठाण्यातल्या तीन हात नाका भागात असलेल्या चेकमेट या खासगी कंपनीवर मंगळवारी दरोडा टाकला होता. यात तब्बल 9 कोटी 16 लाखांची रोकड लुटण्यात आली होती. सुरक्षारक्षकांना आणि कर्मचार्‍यांना चाकू आणि बंदुकीचा धाक दाखवत ही चोरी केली होती.

thane_roberyकोणताही पुरावा हाती लागू नये म्हणून या कंपनीच्या पैसे ठेवण्याच्या ठिकाणातील सीसीटीव्ही आणि त्याचे ड्राईव्ह सुद्धा चोरट्यांनी पळवून नेले होते. पोलिसांनी या दरोडेखोरांना पकडण्यासाठी वेगवेगळ्या टीम तयार केल्या होत्या.

दोन दिवसांच्या शोध मोहिमेनंतर या लूट प्रकरणातील आरोपींपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आलंय. नाशिकमधील अयोध्या हॉटेलमध्ये लपून बसलेल्या 2 आरोपींना आधी ताब्यात घेण्यात आलंय.

त्यानंतर इतर पाच साथीदार्‍यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून 7 कोटींची रोकड हस्तगत करण्यात आलीये. अजूनही 10 आरोपींचा शोध सुरू असून नाशिकच्या सातपूर भागात कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 30, 2016 05:06 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close