S M L

ठाणे 'चेकमेट' दरोड्याचा पर्दाफाश, कंपनीचा माजी कर्मचारीच निघाला मुख्य सूत्रधार

Sachin Salve | Updated On: Jul 1, 2016 03:17 PM IST

ठाणे 'चेकमेट' दरोड्याचा पर्दाफाश, कंपनीचा माजी कर्मचारीच निघाला मुख्य सूत्रधार

01 जुलै : ठाण्यातील " चेकमेट" कंपनीत पडलेल्या 9 कोटी 16 लाखांच्या दरोड्याची उकल करण्यात ठाणे पोलिसांना अखेर यश आले आहे. एकूण 21 आरोपींपैकी 6 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 4 कोटी 32 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. कंपनीचा माजी कर्मचारीच मुख्य सूत्रधार निघाला आहे. या धाडसी दरोड्या दरम्यान सीसीटीव्ही रेकॉर्डर देखील चोरट्यानी पळवून नेला होता. परंतु, पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करून काही चोरट्याना जेरबंद केले. पोलिसांच्या 8 टीम अजूनही बाकीच्या दरोडेखोरांचा शोध घेत असून त्यांनाही लवकरच पकडू असा विश्वास व्यक्त केला आहे.

thane_chekmetठाण्यातील "चेकमेट " या पैश्यांची ने आण करणार्‍या कंपनीवर तीन दिवसांपूर्वी धाडसी दरोडा पडला. या दरोड्याने ठाणे पोलिसांची झोपेच उडाली. चेहरे झाकून आलेल्या काही दरोडेखोरांनी 10 ते 15 मिनिटांच्या अवधीत तब्बल 9 कोटी 16 लाखांची रोकड उचलून नेली. कंपनीमध्ये त्यावेळी 25 कोटींची रोकड होती. परंतु, चोरट्यानी आपल्याला नेता येईल एवढीचं रोकड नेली. त्यांनी जाताना सीसी

टीव्ही रेकॉर्डर देखील नेला.

त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. परंतु, पोलिसांनी लगेच टीम तयार केल्या आणि दोन दिवसांतच ठाणे आणि नाशिक येथून 6 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 4 कोटींहून अधिक रोकड जप्त केली. या दरोड्याचा सूत्रधार कंपनीचा माजी कर्मचारी आकाश चव्हाण होता. त्याने एक टोळी बनवून दोन महिने कट रचला. आत्तापर्यंत नितेश आव्हाड, अमोल कार्ले, आकाश चव्हाण, मयूर कदम, उमेश वाघ आणि हरिश्चंद्र मते या दरोडेखोरांना अटक केलीये.

आकाश चव्हाण याने अमोल कार्ले या कर्मचार्‍याच्या साथीने हा दरोडा टाकला. अमोल कार्ले हा दरोड्याच्या वेळी तिथे उपस्थित तर होताच परंतु चौकशीदरम्यान पोलिसांची दिशाभूल करण्याचे काम देखील त्याने केले अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबिर सिंग यांनी दिली. पोलिसांच्या एकूण 8 टीम राज्यात आणी राज्या बाहेर जाऊन फरार आरोपींचा तपास करीत आहेत. सदर गुन्ह्यात वापरण्यात आले तीन गाड्या देखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2016 03:17 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close