S M L

लोणावळ्यात भरलं भारतीय रेल्वेचं रोमहर्षक प्रदर्शन

13 ऑक्टाबर, लोणावळा - भारतीय रेल्वेचा दीडशे वर्षांचा इतिहास सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी लोणावळा इथे रेल्वेने एक प्रदर्शन भरवलं आहे.या प्रदर्शनात अगदी वाफेच्या इंजिनापासून अत्याधुनिक इंजिनापर्यंतचा प्रवास मांडण्यात आला आहे. येत्या दोन वर्षांत लोणावळ्यात भारतातील सर्वांत मोठं रेल्वे संग्रहालय उभं राहत आहे. त्या पार्श्वभूमीवरच भरवण्यात आलेलं आहे. मंंुबई ते ठाणे दरम्यान 1853 मध्ये धावल्यापासून , भारतीय रेल्वेचा प्रवास अतिशय रोमहर्षक आहे. गेल्या 155 वर्षांचा हाच इतिहास लोणावळा इथं प्रदर्शनाच्या रुपात मांडण्यात आला आहे. इंजिनाचे मॉडेल्स् , तसंच छायाचित्रांच्या स्वरुपात याची मांडणी करण्यात आली आहे. वाफेच्या इंजिनापासून ते अत्याधुनिक इंजिनापर्यंत मॉडेल्स् ठेवण्यात आले आहेत. 1829 मध्ये बनलेल्या रॉकेट इंजिनाची प्रतिकृती, भारतात सर्वांत पहिल्यांदा धावलेलं फॉकलंड, तसंच नेरळ माथेरान धावणारी मिनी ट्रेनही इथे बघायला मिळते. प्रदर्शन बघण्यासाठी आबालवृद्ध गर्दी करत आहेत. हे प्रदर्शन येत्या 19 ऑक्टोबरपर्यंत पाहायला मिळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Oct 13, 2008 04:17 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 13, 2008 04:17 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close