S M L

बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी धनंजय मुंडेंची मध्यरात्री एसआयटीकडून चौकशी

Sachin Salve | Updated On: Jul 1, 2016 03:43 PM IST

d_munde3423बीड -01 जुलै : बीड जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंची एसआयटीनं चौकशी केली. मध्यरात्रीच्या सुमारास ही चौकशी झाली. तब्बल अडीच तास धनंजय मुंडे यांची चौकशी केल्याचं सांगण्यात येतंय. आमदार अमरसिंह पंडित यांचीही चौकशी करण्यात आली. या दरम्यान त्यांनी धनंजय यांचा जवाब देखील नोंदवून घेतला तर अमरसिंह पंडित यांची ते अध्यक्ष असताना वाटप करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणी उलटसुलट तपासणी केली.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 147 कोटी रुपयांच्या बेकायदेशीर कर्ज घोटाळ्यासंबंधी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना काल अखेर एसआयटीसमोर यावंच लागलं. एसआयटीने दिलेली डेडलाईन ही कालच संपत होती. त्यामुळे सर्व प्रसिद्धी माध्यमांना चुकवीत मध्यरात्री साडे बारा वाजत धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित हे पोलीस अधीक्षक कार्यालयात एसआयटीसमोर हजार झाले.

धनंजय मुंडे आणि अमरसिंह पंडित यांची रात्रीच त्यांच्याशी सखोल चौकशी केली असल्याचं एसआयटी प्रमुख दीक्षितकुमार गेडाम यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 1, 2016 03:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close