S M L

चेंबूरच्या आरसीएफमध्ये स्फोट, 3 ठार

Sachin Salve | Updated On: Jul 2, 2016 10:37 PM IST

चेंबूरच्या आरसीएफमध्ये स्फोट, 3 ठार

02 जुलै :: मुंबईतील चेंबूर येथील राष्ट्रीय केमिकल फॅक्टरी (आरसीएफ )मध्ये बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे 3 कामगारांचा मृत्यू झालाय. तर तीन जण जखमी आहे. जखमी आरसीएफच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय.

माहूलगावाजवळ असलेल्या आरसीएफमध्ये शनिवारी संध्याकाळी सहा सुमारास भीषण स्फोट झाला. बॉयलर दुरस्तीचे काम सुरू असतांना हा स्फोट झाल्याचं कळतंय. मात्र, या स्फोटाचं नेमक कारण अजून स्पष्ट झालं नाहीये. या स्फोटात दिलीप पवार, नूर मोहम्मद आणि गोविंदकुमार या तीन कामगारांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहे. चार जखमींना आरसीएफच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर एका जखमीला चेंबुराच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. हा स्फोट कशामुळे झाला याची माहिती अजून आरसीएफकडून मिळाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 2, 2016 07:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close