S M L

मुंबईत पावसाची विश्रांती, उपनगरात रिपरिप सुरूच

Sachin Salve | Updated On: Jul 4, 2016 02:23 PM IST

०३ जुलै : मुंबईत काल दिवसभर मुसळधार बरसल्यानंतर आज पावसानं जरा विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आज मुंबईतले रस्ते मोकळे दिसत आहेत. काल मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्यानं ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली होती.आज रविवार असल्याने पावसानेही सुट्टी घेतल्यामुळे मुंबईकर सुट्टीचा आनंद लुटत आहे. परंतु, ठाणे,डोंबिवली आणि उपनगरात पावसाची रिपरिप सुरूच आहे.MUMBAI RAIN (10)

शुक्रवारी सायंकाळी सुरु झालेला पाऊस शनिवारी दिवसभर सुरु होता. त्यामुळे मुंबापुरी अनेक ठिकाणी जलमय झाली होती. आज रात्री 11.03 वाजता भरती असल्यानं पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या 24 तासात कुलाबा वेधशाळेत 61 मीमी तर सांताक्रूझ वेधशाळेत 77 मीमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

वसई तालुक्यात पावसाने दमदार हजेरी

वसईत आत्तापर्यंत 116 मिमी ,माणिकपूरमध्ये 60.5 मिमी, मांडवीत 74.5 मिमी, आगाशीत 112 मिमी, विरार 67 मिमी पावसाची नोंद झालीये. पालघरमध्ये सूर्या नदीला पूर आल्याने मासवण पंपिंग स्टेशनचे 2 पंप बंद करण्यात आलेत. जॅकव्हिलमध्ये पुन्हा गाळ जमा झाल्याने पंप चोकप होवून कमी पाणीपुरवठा करत आहे. 2 पंप सुरु करण्यात आले असून 2 पंपांचे काम सुरु आहे ते 12 वाजेपर्यंत सुरु करण्यात येतील असे कार्यकारी अभियंता बी एम माचेवाड यांनी सांगितले .

तर पालघरच्या सुर्या नदीला पूर आल्याने मासवण पंप स्टेशनचे सर्व पंप बंद करण्यात आलेत. जॅकव्हिलमध्ये पुन्हा गाळ जमा होऊन पंप चोकप झाल्यानं कमी पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे वसई-विरार शहरास होणारा पाणीपुरवठा पुर्णपणे बंद आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2016 04:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close