S M L

बगदाद बॉम्बस्फोटाने हादरलं, ८२ ठार

Sachin Salve | Updated On: Jul 4, 2016 02:24 PM IST

बगदाद बॉम्बस्फोटाने हादरलं, ८२ ठार

०३ जुलै : इराकची राजधानी बगदाद दोन शक्तिशाली स्फोटाने हादरली. या स्फोटात ८२ लोकांचा मृत्यू झाला. यात १५ मुलं, १० महिला आणि ६ पोलिसांचा समावेश आहे. मृताचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या स्फोटाची जबाबदारी आयसिसने घेतली आहे.

बगदादमधील मध्य कराडा जिल्ह्यातील गर्दीने गजबजलेल्या भागात एका शॉपिंग सेंटरच्या बाहेर एका आत्मघातकी दहशतवाद्याने स्फोटकाने भरलेला ट्रक उडवला. या स्फोटात ८२ लोकांचा मृत्यू झाला. जवळपास १७० लोक यात जखमी झाले. या स्फोटात१५ मुलं, १० महिला आणि ६ पोलिसांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर आयसिसने फलूजा शहर मुक्त करण्याचा इशारा दिलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2016 01:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close