S M L

स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राहुल शेवाळे

5 एप्रिलमुंबई महानगरपालिकेत स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नगरसेवक राहुल शेवाळे यांची निवड झाली आहे. तर शिक्षण समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपच्या रुक्मिणी खरटमोल यांची निवड झाली आहे. त्या सहा मतांनी विजयी झाल्या आहेत. यापूर्वी राहुल शेवाळे यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी बंडखोरी करण्याचाही प्रयत्न केला होता. यापूर्वी शिवसेनेचे रवींद्र वायकर यांनाच तीन वेळा स्थायी समितीचे अध्यक्षपद मिळाले होते.स्थायी समितीचे अध्यक्षपद हे आर्थिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे असल्याने मातोश्रीची ज्याच्यावर मर्जी असते त्यालाच हे पद मिळते. यावेळी राहुल शेवाळे स्थायी समिती मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. पण शेवाळेंच्या निवडीबाबत सेनेच्याच नगरसेविका मंगला काते यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 5, 2010 12:01 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 5, 2010 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close