S M L

सलमानचं 'ते' वक्तव्य असंवेदनशील - आमिर खान

Samruddha Bhambure | Updated On: Jul 4, 2016 06:26 PM IST

सलमानचं 'ते' वक्तव्य असंवेदनशील - आमिर खान

04 जुलै :  अभिनेता सलमान खानने महिलांसदर्भात केलेलं 'ते' वक्तव्य दुदैर्वी आणि असंवेदनशील असल्याचं परखड मत आमिर खानने व्यक्त केलं आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सलमान खानचा मोठा दबदबा असल्यामुळे त्याच्याविरुद्ध भूमिका घेताना अनेकजण दहावेळा विचार करतात. मात्र, आमिरने आज (सोमवारी) 'दंगल'च्या पोस्टर प्रदर्शनावेळी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली.

यावेळी आमिर खानने म्हटले की, सलमानने हे वक्तव्य केले तेव्हा मी त्याठिकाणी प्रत्यक्षात उपस्थित नव्हतो. मात्र, गेल्या काही दिवसांत मी ज्या बातम्या वाचल्या आहेत, निदान त्यावरून तरी सलमानचे वक्तव्य दुदैर्वी आणि असंवेदनशील असल्याचं मला वाटतं. याविषयी मी अजून सलमानशी बोललो नाही, असंही आमिरने सांगितलं. मात्र, तू सलमानला काय सल्ला देशील, असा प्रश्न विचारला असता, मी सलमानला सल्ला देणारा कोण आहे, असा प्रतिप्रश्न आमिरने उपस्थित केला.

तसंच, यासोबत माध्यमांनाही नकारात्मक गोष्टीला लावून धरण्यात जास्त इंटरेस्ट असल्याचं सांगत आपण स्वत:ही अशा वक्तव्याचे काय परिणाम होतात, ते भोगलं असल्याचंही आमिरने यावेळी बोलताना सांगितलं आहे.

सलमान खानने 'सुलतान' या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याचा अनुभव सांगताना शुटिंग आटपून रिंगणातून बाहेर यायचो तेव्हा मला बलात्कार झालेल्या महिलेप्रमाणे वाटायचं, असं म्हणाला होता. त्याच्या विधानामुळे त्याच्यावर सर्वच स्तरातून टीका झाली होती. याप्रकरणी महिला आयोगाने सलमानला हजर राहून स्पष्टीकरण देण्याचे आदेशही दिले आहेत. अनेकजणांकडून सलमानवर टीकाही करण्यात आली आहे. मात्र, बॉलीवूड इंडस्ट्रीतील अनेकजण याबाबत गप्प बसनचं पसंत करत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2016 06:26 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close