S M L

राज्य मंत्रिमंडळाचा 7 जुलैला विस्तार, भाजपचे 5 तर सेनेचे 2 मंत्री घेणार शपथ

Sachin Salve | Updated On: Jul 5, 2016 09:38 AM IST

राज्य मंत्रिमंडळाचा 7 जुलैला विस्तार, भाजपचे 5 तर सेनेचे 2 मंत्री घेणार शपथ

04 जुलै : केंद्रापाठोपाठ राज्यमंत्रिमंडळाचा विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरलाय. येत्या 7 जुलैला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या मंत्रिमंडळात 9 मंत्री शपथ घेणार आहे. भाजपचे 5 तर शिवसेनेचे 2 मंत्री शपथ घेणार आहे. तर ठरल्याप्रमाणे मित्रपक्षांनाही संधी देण्यात आलीये. सदाभाऊ खोत आणि महादेव जानकर मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. तर मंत्रिपदासाठी भाजपमध्ये शर्यत सुरू झालीये.

10 जुलैच्या आता मंत्रिमंडळाचा विस्तार करणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात केली होती. अखेर मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द खरा ठरवलाय. 7 जुलै रोजी मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार होणार आहे. एकनाथ खडसे मंत्रिपदावरून पायउतार झाल्यामुळे त्यांच्या पदाचा भार कुणाकडे जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 7 जुलै रोजी भाजपचे 5 आणि शिवसेनेचे 2 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. तर आधीच ठरल्याप्रमाणे सदाभाऊ खोत, महादेव जानकर मंत्रिपदाची शपथ घेणार आहे.

शिवसेनेकडून आमदार गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर यांची नावं आधीपासून चर्चेत आहे. तर भाजपकडून पाचपदासाठी अनेक दावेदार पुढे आले आहे. भाजपकडून लातूरमधून संभाजी पाटील निलंगेकर पहिल्यापासून दावेदार आहे. त्यांचं नाव पहिल्यापासून निश्चित मानलं जातंय. तर बुलडाण्यातून पाडूरंग फूंडकर किंवा संजय कुटे यांचीही नावं शर्यतीत आहे. पश्चिम विदर्भातून मदन येरावर यांचं नाव निश्चित मानलं जात आहे. पश्चिम महाराष्ट्रातून सुरेश खाडे किंवा शिवाजीराव नाईक यांचं नावही पुढे आलंय.

दरम्यान, शिवसेना आणखी एक पद मागत आहे. मात्र ती फेटाळली जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी सकाळीच 'भीक नको, सन्मानाने द्या' अशी रोखठोक भूमिका मांडली होती. आता मंत्रिमंडळात समावेशानंतर उद्धव ठाकरे काय भूमिका घेता याकडे लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2016 08:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close