S M L

केंद्रीय मंत्रिमंडळात सेनेला जागाच नाही, उद्धव ठाकरे नाराज

Sachin Salve | Updated On: Jul 5, 2016 03:18 PM IST

केंद्रीय मंत्रिमंडळात सेनेला जागाच नाही, उद्धव ठाकरे नाराज

05 जुलै : नरेंद्र मोदी सरकारचा विस्तार झाला खरा पण शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंचा आजचा चेहरा पाहण्यासारखा आहे. कालपर्यंत भीक नको, हवे हक्काचे असं ठणकावून सांगणार्‍या उद्धव ठाकरेंची आजची उत्तरं मात्रं एका वाक्याची राहिली. उद्धव ठाकरेंची नाराजी स्पष्टपणे दिसून आली.

नाशिकच्या मनसेच्या चार नगरसेवकांनी आज शिवसेनेत मातोश्रीवर प्रवेश केला. त्यात तीन नगरसेविकांचा समावेश आहे. पण पत्रकारांनी त्यांना बोलतं केलं ते केंद्र आणि राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्तारावर.

शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद हवं होतं पण ते मिळालेलं नाही हे उद्धव ठाकरेंच्या कालच्याच बोलण्यावरून स्पष्ट झालेलं पण रात्रीतून काही घडामोडी घडतील आणि अनिल देसाई आज मंत्रिपदाची शपथ घेतील असं सांगितलं जात होतं. पण भाजपने शिवसेनेला वाट पहायला लावलंय आणि ते किती वेदनादायी आहे याची झलक उद्धव ठाकरेंच्या बोलण्यात आणि चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 5, 2016 03:18 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close