S M L

चिमुकलीला नदीत फेकणार्‍या बापाला अखेर अटक

Sachin Salve | Updated On: Jul 6, 2016 11:56 AM IST

चिमुकलीला नदीत फेकणार्‍या बापाला अखेर अटक

ठाणे - 06 जुलै : 8 वर्षांच्या चिमुकलीला उल्हास नदीत फेकून देणार्‍या सावत्र बापाला अखेर वर्तकनगर पोलिसांनी गजाआड केलं आहे. न्यायालयाने त्याला 7 जुलैपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. हे निर्घृण कृत्य केल्यावर आपला मोबाईल बंद करून तुळशीराम सैनी कल्याण इथं लपून बसला होता. परंतु, वर्तक नगर पोलिसांनी शिताफीने त्याचा माग काढत त्याच्या मुसक्या आवळल्या.

30 जून रोजी तुळशीराम सैनी या नराधमाने बायकोबरोबर असलेल्या वादाचा बदल घेण्यासाठी एकता सैनी या आपल्या 8 वर्षीय सावत्र मुलीला ठाण्यातील तिच्या घरून नवीन पुस्तके आणि नवीन चप्पल देण्याचे आमिष दाखवत पळवले आणि बदलापूर वालिवली येथील

उल्हास नदीच्या पात्रात फेकून दिले.

सुदैवाने नदीत जलपर्णी वाढल्याने ही चिमुकली वाचली आणि अख्खी रात्र तिने या जलपर्णीला धरून काढली. सकाळी तिथून जाणार्‍या लोकांना तिचा मदतीसाठी हाक ऐकून पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने तिला बाहेर काढले. ठाण्यातील शासकीय रुग्णालयात उपचार करून तिच्या आईचा शोध घेऊन तिला तिच्या आईच्या स्वाधीन केले. मग वर्तकनगर पोलिसांनी त्याच्या मोबाईलचा माग काढून नराधम बापाच्या मुसक्या देखील आवळल्या. त्याला कोर्टात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 6, 2016 11:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close