S M L

आम्ही थापा मारणारे राजकारणी नाहीत -उद्धव ठाकरे

Sachin Salve | Updated On: Jul 7, 2016 09:20 AM IST

ठाणे - 07 जुलै : आम्ही थापा मारणारे राजकारणी नाहीत. राजकारण्यांची थाप कशी असते ते माहीत आहे. आम्ही जे चांगले आहे त्याला चांगले म्हणतो आणि जे पटत नाही त्याला नाही म्हणतो असा आमचा रोखठोक कारभार आहे, असा टोलाशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला. ते ठाण्यात बोलत होते.

Uddhav2312ठाण्याच्या गडकरी रंगायतन मध्ये आयोजित कच्छ समाजाच्या कार्यक्रमास उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले जेव्हा आपली माणसे बोलावतात तेव्हा नाही म्हणता येत नाही. शिवसेनेचे आणि ठाण्याचे एक वेगळे नाते आहे. कुणीही माणूस मानसन्मान मिळवण्यासाठी काम करीत नाही. आपले म्हणून काम करतो. अशा वेळी जर कामाबद्दल कर्तृत्वाची थाप मारली तर उत्साह वाढतो.

आज महाराष्ट्रात तुम्ही व्यवसाय करता तो सुरक्षित करता यावे म्हणून शिवसेना तुमचे संरक्षण करते. तुम्ही जय महाराष्ट्र म्हणालात म्हणजे दुरावा आधीच कमी झाला. तुम्ही दुधात साखर विरघळावी तसे तुम्ही शिवसेनेत विरघळलात तुम्ही शिवसेनेच्या मागे राहावं असं आवाहन करीत उद्धव ठाकरे यांनी कच्छ समाजाची रजा घेतली. या कार्यक्रमात कच्छ समाजाने उद्धव ठाकरे यांना पगडी भेट देऊन त्याचा सत्कार केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ठाण्यातील कच्च समाजाला आकर्षित करण्यासाठी सदरचा कार्यक्रम राबविण्यात आला असल्याची चर्चा सुरू होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2016 09:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close