S M L

मस्जिद बंदरजवळ उद्यान एक्स्प्रेसचं इंजिन घसरलं

Sachin Salve | Updated On: Jul 7, 2016 02:18 PM IST

मस्जिद बंदरजवळ उद्यान एक्स्प्रेसचं इंजिन घसरलं

uddyan_expressमुंबई, 07 जुलै : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. उद्यान एक्स्प्रेसचं इंजिन सीएसटी आणि मस्जिद स्टेशनदरम्यान रुळांवरुन घसरलंय. त्यामुळे सीएसटीहून कल्याणकडे जाणार्‍या जलद मार्गावरील वाहतूक ठप्प झालीये.

जलद मार्गावरच्या सर्व गाड्या स्लो ट्रॅकवरुन वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकलंचं वेळापत्रक कोलडमडलंय. स्लो ट्रॅकवर फास्ट गाड्यांची वाहतूक वळवण्यात आल्यामुळे 15 ते 20 मिनिटे उशिराने गाड्या धावत आहे. ऐन सकाळी वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहे. रुळावरुन घसरलेलं इंजिन परत रुळावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2016 10:20 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close