S M L

बांगलादेशमध्ये ईदच्या नमाजावेळी बॉम्बस्फोट, 2 ठार

Sachin Salve | Updated On: Jul 7, 2016 12:23 PM IST

बांगलादेशमध्ये ईदच्या नमाजावेळी बॉम्बस्फोट, 2 ठार

07 जुलै : बांगलादेशमध्ये मोठ्या उत्साहात ईद साजरी होत आहे. मात्र, आजच्या दिवशी दहशतवाद्यांनी ईदच्या कार्यक्रमादरम्यान बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात दोन पोलीस ठार झाले तर 9 जण जखमी झाले आहे. या स्फोटानंतर झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आलंय.

राजधानी ढाकापासून 80 किलोमिटर अंतरावर असलेल्या किशोरगंजमधील शोलाकिया ईदहाह मैदानात ईदची नमाज अदा केली जात होती. यासाठी जवळपास 3 लाख लोकं उपस्थितीत होते. दहशतवाद्यांनी ईदगाह मैदानाला लक्ष करत बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटात 2 पोलिसांचा मृत्यू झालाय तर 9 जण जखमी झाले आहे.

बांगलादेशचे माहिती आणि प्रसारण मंत्री हसनुल हक इनू यांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांवर दहशतवाद्यांनी बॉम्ब फेकला. पोलिसांनी याला प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याचा खात्मा केला. हा धार्मिक हल्ला नसून राजकीय हल्ला होता असंही हसनुल हक इनू यांनी सांगितलं. सहा दिवसांपूर्वीच ढाकामध्ये दहशतवाद्यांनी आत्मघातकी स्फोट घडवून आणला होता. या स्फोटात 22 जण ठार झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2016 12:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close