S M L

बँक कर्मचार्‍यांना मिळणार पगारवाढ

6 एप्रिलपुढच्या महिन्यात बँक कर्मचार्‍यांना एक खूषखबर मिळणार आहे. सरकारी बँक कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये 35 टक्क्यांपर्यंत वाढ होणार आहे. आणि ही पगारवाढ 1 नोव्हेंबर 2007 पासून मिळणार आहे.सरकारी बँकांच्या कर्मचार्‍यांचा पगार वाढणार आहे. इंडियन बँक्स असोसिएशन, एम्प्लॉईज असोसिएशन आणि मॅनेजमेंट यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीत हा तोडगा निघाला आहे. यानुसार बँक कर्मचार्‍यांचा पगार 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा वाढीव पगार नोव्हेंबर 2007पासून दिला जाणार आहे.या बैठकीत ठरल्यानुसार बँक अधिकारी आणि एक्झिक्युटिव्ह क्लासची सॅलरी 25 ते 35 टक्क्यांनी वाढेल. तर बँक मॅनेजर आणि त्याखालच्या पदांचा पगार 20 टक्क्यांनी वाढेल. 15 एप्रिलपर्यंत या करारावर सह्या होतील आणि 10 लाख बँक कर्मचार्‍यांना याचा फायदा मिळेल. ऍरियर्स मिळून बँकांना तब्बल 11,600 कोटी रुपये कर्मचार्‍यांना द्यावे लागतील. इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा ग्राहकांच्या हातात आल्याने याचा फायदा फक्त बँक कर्मचार्‍यांनाच नाही तर एकूणच अर्थव्यवस्थेला होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2010 10:50 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2010 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close