S M L

महसूल खातं चंद्रकांत पाटलांकडे ?

Sachin Salve | Updated On: Jul 8, 2016 08:35 AM IST

FMNAIMAGE31440Kolhapur_Chandrakant Patil08 जुलै : माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या मंत्रिमंडळातल्या गच्छंतीनंतर रिकामं असलेलं महसूल खातं अखेर सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. पण पाटलांकडचं आताचं खातं तसंच ठेवून महसूल दिलं जाईल की सहकार मंत्रिपदी आणखी कुणाची वर्णी लागणार याबाबत फक्त अंदाज व्यक्त केले जात आहे.

मात्र, पाटलांकडचं सार्वजनिक बांधकाम हे सेनेला दिलं जाण्याची शक्यताही वर्तवली जातेय. महसूल आणि सहकार अशी दोन्ही खाती चंद्रकांत पाटील यांच्याकडे असतील अशीही माहिती मिळतेय. मोदींनी मंत्रीमंडळ विस्तारात नव्या चेहर्‍यांना संधी दिलीय. त्यानंतरच्या खातेवाटपात धक्कातंत्र वापरलेलं. तसंच काहीसं धक्कातंत्र राज्यातल्या खातेवाटपातही पहायला मिळेल असा जाणकारांचा अंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2016 08:35 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close