S M L

...'यांचा' होणार टीम फडणवीसमध्ये सहभाग

Sachin Salve | Updated On: Jul 8, 2016 12:24 PM IST

...'यांचा' होणार टीम फडणवीसमध्ये सहभाग

08 जुलै : राज्यमंत्रिमंडळाचा आज विस्ताराचा होणार आहे. एकूण 11 जण आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहे. भाजपचे सहा मंत्री तर सेनेचे 2 मंत्री शपथ घेणार आहे. भाजपने दिलेला शब्द पाळत मित्रपक्षांना अखेर मंत्रिपदाची खुर्ची पुढे सरकावली आहे. केंद्राप्रमाणेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुण आणि अनुभवी नेत्यांना संधी दिलीये.

ज्याप्रमाणे प्रकाश जावडेकरांना बढती मिळाली त्याप्रमाणे राज्यमंत्र्यांपैकी एकमेव राम शिंदेंना कॅबिनेटपदी बढती मिळालीये. तर भाजपने पांडुरंग फुंडकर यांच्यासारख्या मातब्बर नेत्याला संधी देऊन आखाड्यात उतरवलंय. तर भाजपने धुळ्याचे जयकुमार रावल, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांना संधी दिली आहे. केंद्राप्रमाणेच देवेंद्र फडणवीस यांनीही 'मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नन्स'वर भर दिला. आता टीम फडणवीसमध्ये 10 जणांचा समावेश झाला आहे.

- मंत्रिमंडळातील नवे चेहरे

-भाजप

1) मदन येरावार

-मतदारसंघ-यवतमाळ

-तिसर्‍यांदा आमदार

-नगरसेवक ते आमदारपदाचा टप्पा

2) जयकुमार रावल

-मतदारसंघ-सिंदखेडा (धुळे)

-तिसर्‍यांदा आमदार

-पक्षाचा उच्चशिक्षित आणि तरुण चेहरा

3) पांडुरंग फुंडकर

-विधान परिषद सदस्य

-भाजपचे ज्येष्ठ ओबीसी नेते

-खासदार, प्रदेशाध्यक्ष, मंत्री, विरोधी पक्षनेतेपद भूषवलंय

4) संभाजी पाटील निलंगेकर

-मतदारसंघ-निलंगा (लातूर)

-दुसर्‍यांदा आमदार

-तरुण नेतृत्व, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष होते

5) सुभाष देशमुख

-मतदारसंघ-द.सोलापूर

-दुसर्‍यांदा आमदार

-खासदार, प्रदेश उपाध्यक्षपद भूषवलं, सहकारमधलं मातब्बर नेतृत्व

6) रवींद्र चव्हाण

-मतदारसंघ-डोंबिवली

-दुसर्‍यांदा आमदार

-केडीएमसीत भाजपचं संख्याबळ वाढवल्याचं बक्षीस

7) राम शिंदे

-कॅबिनेटपदी बढती

-मतदारसंघ - कर्जत - जामखेड

-आमदारकीची दुसरी टर्म

-उत्तम कामगीरीमुळे बढती अभ्यासू

-प्रशासनावर उत्तम पकड

-शिवसेना

1) अर्जुन खोतकर

-मतदारसंघ- जालना

-आमदारकीची 4थी टर्म

-युतीच्या काळातही राज्यमंत्री

2) गुलाबराव पाटील

-मतदारसंघ - जळगाव ग्रामीण

-आमदारकीच्या 3 टर्म

-खडसेंचे कट्टर प्रतिस्पर्धी

 

 

-मित्रपक्ष

1) सदाभाऊ खोत

-विधान परिषद सदस्य

-प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना

-ऊस, दूध आंदोलनाचा आक्रमक, रांगडा चेहरा

 

2) महादेव जानकर

-अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष

-धनगर समाजाचे नेते

-लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंना जेरीस आणलं

-पंकजा मुंडे यांचे कट्टर समर्थक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2016 08:57 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close