S M L

उद्धव ठाकरे नाराज, शपथविधीकडे फिरवली पाठ

Sachin Salve | Updated On: Jul 8, 2016 03:15 PM IST

Uddhav Thackeray BESTमुंबई, 08 जुलै : 'सत्तेसाठी आम्ही लाचार नाही, जे हक्काचे आहे ते सन्मानाने द्या' अशी रोखठोक भूमिका मांडणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली. शिवसेनेनं आणखी एक कॅबिनेटपदाची मागणी केली होती पण भाजपने ती फेटाळून लावली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी यावर नाराजी व्यक्त केलीये.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला. मात्र, शिवसेनेसोबतच्या वादावर पडदा पडलेला असतानाही उद्धव ठाकरे यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरविली. विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये हा शपथविधी सोहळा झाला. शिवसेनेच्या गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळ विस्तारला गैरहजर असणारे उद्धव ठाकरे नायर हॉस्पिटलमधील कार्डियाक कॅथलॅबच्या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हॉस्पिटलमधील हृदयरोग अतिदक्षता विभागाचे उद्घाटन करण्यात आलंय. विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या विस्तारातही शिवसेनेला डावलण्यात आलं होतं. राज्य मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेनं कॅबिनेटपदाची मागणी केली. पण, भाजपने सेनेचा दबाव झुगारून लावला. आता उद्धव ठाकरे काय भूमिका घेता याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2016 12:43 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close