S M L

मानवतेचा दूत हरपला, अब्दुल सत्तार ईधी कालवश

Sachin Salve | Updated On: Jul 9, 2016 03:15 PM IST

मानवतेचा दूत हरपला, अब्दुल सत्तार ईधी कालवश

09 जुलै : पाकिस्तानचे ज्येष्ठ समाजसेवक आणि ईधी फाऊंडेशनचे संस्थापक अब्दुल सत्तार ईधी यांचं आज पहाटे कराचीत निधन झालं. 'केवळ मानवतेसाठी' झटणारी व्यक्ती अशी ओळख असणार्‍या ईधी यांनी वयाच्या 88व्या वर्षी कराचीतील एका रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

पंधरा वर्षांपूर्वी अपघाताने सीमा पार करून पाकिस्तानमध्ये गेलेल्या भारतीय गीताचा पोटच्या मुलीप्रमाणे जपणारे आणि तिच्यासह अशा अनेक अनाथ जीवांचा सांभाळ करणारे पाकिस्तानमधील ज्येष्ठ समाजसेवक अब्दुल सत्तार ईधी यांचं नाव जगभर आहे. गेल्या काही महिन्यांपासून किडनीच्या विकाराने आजारी असलेल्या ईधी यांच्यावर कराचीतील मेडिकलमध्ये उपचार सुरू होते, तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं.

1 जानेवारी 1928 साली भारतातील बंतवा येथे जन्म झाला मात्र फाळणीनंतर ते पाकिस्तानात गेले. ईधी यांनी लहान वयातच आपले जीवन समाजसेवेसाठी वाहून घेत गरीबांसाठी काम सुरू केले होते. जवळपास 60 वर्षांपूर्वी त्यांनी 'वेलफेअर' फाऊंडेशनच्या माध्यमातून आपल्या कार्याला सुरूवात केली. त्यानंतर अनाथाश्रम, नर्सिंग होम, दवाखाने, वुमन शेल्टर आणि पुनर्वसन केंद्रांच्या माध्यमातून त्यांनी गरजू आणि गरिबांची सेवा केली आणि त्यासाठी ईधी फाऊंडेशनचीही स्थापना केली. पाकिस्तानसह अनेक देशांमध्ये ईधी फाऊंडेशनचे काम अव्याहतपण सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2016 03:15 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close