S M L

बुर्‍हाणच्या खात्म्यानंतर श्रीनगरमध्ये संचारबंदी ;अमरनाथ यात्राही स्थगित

Sachin Salve | Updated On: Jul 9, 2016 03:58 PM IST

बुर्‍हाणच्या खात्म्यानंतर श्रीनगरमध्ये संचारबंदी ;अमरनाथ यात्राही स्थगित

काश्मीर - 09 जुलै : हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉपचा काश्मीर कमांडर बुर्‍हान वाणी ठार मारल्यामुळे खबरदारी म्हणून आजचा दिवस अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली आहे. काश्मीर खोर्‍यात आज कडक सुरक्षा व्यवस्था आहे. श्रीनगर आणि इतर अनेक ठिकाणी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे.

हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉपचा काश्मीर कमांडर बुर्‍हान वाणी लष्करासोबत झालेल्या चकमकीत मारला गेलाय. अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत त्याच्यासह त्याचे दोन साथीदारही मारले गेलेत. गेल्या काही महिन्यांपासून बुर्‍हानचा लष्कर तसंच नीम लष्करी दलांना शोध होता. पण काश्मीरी लोकांच्या गळ्यातला ताईत बनलेल्या बुर्‍हानला पकडणं सोपं नव्हतं. शेवटी तो मारला गेलाय.

अमरनाथ यात्रा सुखरूपपणे पार पाडू देऊ असं सांगणारा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी बुर्‍हानने प्रसिद्ध केला होता. एवढंच नाहीतर त्याने झाकीरला पाठिंबा द्या असं ट्विट केलं होतं. त्यानंतर तो काही तासांतच मारला गेलाय. गेल्या काही काळात काश्मीरमध्ये जे काही हल्ले झाले त्यात बुर्‍हाणचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे हात होता. शेवटी बुर्‍हाणला मारल्यानंतर त्याची काश्मीर खोर्‍यात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहेत. विशेष म्हणजे बुर्‍हानचं उच्चशिक्षण हे पुण्यात झालं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2016 03:32 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close