S M L

सेक्स रॅकेट प्रकरणी शिवसेनेच्या महिला संघटकाला अटक

Sachin Salve | Updated On: Jul 9, 2016 04:40 PM IST

सेक्स रॅकेट प्रकरणी शिवसेनेच्या महिला संघटकाला अटक

09 जुलै : कल्याणमधील ड्युक्स प्लाझा या हॉटेलमध्ये छापा टाकून कल्याण क्राईम ब्रांचने एका मोठ्या सेक्स रॅकेटचा भांडफोड केलाय. या छाप्यात शिवसेनेच्या उल्हासनगर कॅम्प 1 विभागाची महिला संघटक शोभा गमलाडू उर्फ़ शोभा जाधव हिला सेक्स रॅकेट चालवण्याच्या गुन्ह्यात रंगेहात पकडले आणि 2 मुलींची सुटका करण्यात आलीये.

कल्याण बिर्ला कॉलेजयेथील दुर्गा पॅलेस जुने नाव आताचे ड्युक्स प्लाझा लॉजवर छापा मारून पोलिसांनी शोभा गमलाडूसोबत मॅनेजर, रिक्षाचालक आणि रोख 59,000 हजार रूपये जप्त केले. गेल्या अनेक महिन्यांपासून पोलीस हिच्या मागावर होते. मात्र,

ती हाती लागत नव्हती. काल पोलिसांना तिची खबर मिळताच डमी गिर्‍हाईक पाठवून तिला सापळ्यात पकडले आणि बारवर छापा मारत तिला रंगेहाथ अटक केली. ही महिला एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्यानं एक हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट आहे का? आणि यात कोण कोण सहभागी आहेत का ? याचा आता पोलीस तपास करत आहेत.

दरम्यान शोभा गमलाडू हिच्या पक्षाचा सध्या काहीही संबंध नाही. मागील विधानसभा निवडणुकी दरम्यान पक्षाविरोधी काम केल्याबद्दल तिच्यावर कारवाई करत त्याच वेळी तीची हकालपट्टी करण्यात आली असल्याची माहिती शिवसेनेचे उल्हास नगर शहर प्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली आहे. एखादी व्यक्ती स्वत:हून पक्षाचे आणि पक्षाच्या नेत्यांचे बॅनर लावत असेल तर त्याला कसे रोखणार असा सवाल करत यात पक्षाचा कसलाच संबंध नसल्याचं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2016 04:40 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close