S M L

खडसे माझे दुश्मन नाही, त्यांनी मार्गदर्शन केलं तर ऐकेन -गुलाबराव पाटील

Sachin Salve | Updated On: Jul 9, 2016 07:35 PM IST

खडसे माझे दुश्मन नाही, त्यांनी मार्गदर्शन केलं तर ऐकेन -गुलाबराव पाटील

जळगाव, 09 जुलै : एकनाथ खडसे आणि नवनियुक्त राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातलं सख्य सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळेच जेव्हा गुलाबराव पाटील यांनी खडसेंबद्दल जाहीर आदर व्यक्त केला, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. व्यक्तीश: एकनाथ खडसे काहीही माझे दुश्मन नाही, ते जळगाव जिल्ह्याचे नेते आहेत, माझ्यापेक्षाही वरिष्ठ आहेत. त्यांनी मला मार्गदर्शन केलं तर मी त्यांचं ऐकेन असं गुलाबराव पाटील म्हणाले.

राज्यमंत्रिपदी वर्णी लागलेले जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील आज जिल्ह्यात दाखल झाले. त्यांचं स्वागत शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात केलं. शिवसेना कार्यालयापर्यंत त्यांची ओपन जीप मधून ढोल ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढली. मंत्रिपद मिळाल्यानंतर राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे आज पहिल्यांदाच जिल्ह्यात आले आहेत. त्यांची मंत्रिपदी वर्णी लागल्यामुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये उत्साह वाढला आहे.

एकीकडे भाजपचे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांना सर्व मंत्रिपदांचा राजीनामा द्यावा लागल्याने खडसे समर्थक भाजपवर नाराज आहेत. तर दुसरीकडे खडसेंचे कट्टर विरोधक असलेल्या गुलाबरावांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यात मंत्रिपद गेलेल्या भाजपची ताकद कमी होऊन मंत्रिपद मिळालेल्या शिवसेनेची ताकद वाढण्यात मदत होणार असल्याचे बोलले जात आहे.

याविषयी बोलताना गुलाबराव म्हणाले की, शिवसेनेचे आणि भाजपाचे मंत्री वेगवेगळे आहेत. एकनाथराव खडसे यांना त्यांच्या पक्षाने कमी केले आहे. ते आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत. काही धोरणं चुकत होती, व्यक्तिश: मी त्यांचा दुश्मन आजही नाही, खडसे माझ्या पेक्षा वरिष्ठ आहेत. त्यांनी मला मार्गदर्शन केले तर मी त्यांचे ऐकू पण शकेन अशी प्रतिक्रिया पाटील यांनी दिली.

तसंच राज्यमंत्री म्हणून जे काही योग्य असेल ते मी नक्की करेन. मुख्यमंत्र्यांचा मी आवडता आमदार आहे. हे मला माहिती आहे . सभागृहातला परफॉर्मन्स पाहून मुख्यमंत्री माझ्यावर निश्चितपणाने प्रेम करतात असंही पाटील म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 9, 2016 07:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close