S M L

पंकजा मुंडेच्या समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

Samruddha Bhambure | Updated On: Jul 10, 2016 06:16 PM IST

पंकजा मुंडेच्या समर्थकांकडून मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

10 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा वापर करीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे जलसंधारण खातं राम शिंदे यांच्याकडे सोपवलं आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मुंडे समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडे यांच्यासह विनोद तावडे यांच्याकडील एक खात काढून घेत त्यांना धक्का दिला होता. यावरून पंकजा यांनी ट्विटरवरून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज पाथर्डीमध्ये पंकजांच्या सर्थकांनी फडणवीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. या प्रकारामुळे राज्य सरकारमध्ये दोन गट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी जलसंधारण खाते काढून घेतल्यामुळे काल पंकजा मुंडेंनी ट्विटरवरुन आपली नाराजी व्यक्त केली होती. सिंगापूरमध्ये होणार्‍या वर्ल्ड वॉटर लीडर समिटला उपस्थित रहाण्याचे निमंत्रण मिळालं होतं. पण आता मी त्या खात्याची मंत्री राहिली नसल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाही असं ट्विट पंकजा मुंडेंनी केलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी 'तुम्ही वरिष्ठमंत्री या नात्याने सरकारच्या प्रतिनिधी म्हणून वर्ल्ड वॉटर लीडर समिटला उपस्थित राहीलं पाहिजे, असं उत्तर दिलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2016 06:16 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close