S M L

पोर्तुगालने रचला इतिहास, पहिल्यांदाच युरो कपचं जेतेपद

Samruddha Bhambure | Updated On: Jul 11, 2016 01:29 PM IST

पोर्तुगालने रचला इतिहास, पहिल्यांदाच युरो कपचं जेतेपद

11 जुलै :  ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालने यजमान फ्रान्सवर 1-0 अशी मात करुन युरो कपच्या इतिहासात पहिल्यांदाच विजेतेपद मिळवलं. 2004 नंतर पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेल्या पोर्तुगाल फ्रान्सवर विजय मिळवून इतिहास रचला असून युरो कप जिंकण्याचं स्वप्न साकारलं आहे.

खरंतर युरो कपच्या फायनल्समध्ये फ्रान्सचं पारडं जड मानलं जात होतं. सामना सुरू होवून 10 मिनिटांचा अवधी होत नाही तोच पोर्तुगाल संघाला जबर धक्का बसला. पोर्तुगालचा स्टार कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोला गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे त्याला सामना अर्धवट सोडावा लागला. यावेळी रोनाल्डोला आपले अश्रूही अनावर झाले होते.

रोनाल्डोच्या गैरहजेरीत नानीने कर्णधारपद सांभाळले. 90 मिनिटांच्या कालावधीत फ्रान्सकडून अनेकदा गोल करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोर्तुगालचा गोलकिपर लुइस पेट्रीश्योने जबरदस्त किपिंग करीत फ्रान्सचे आव्हान परतवून लावले.

90 मिनिटांच्या वेळेनंतर देण्यात आलेल्या अतिरिक्त वेळेत दोन्ही संघाकडून गोल करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. कर्णधार रोनाल्डोच्या गैरहजेरीत हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जाईल असे वाटत असतानाच पोर्तुगालचा खेळाडू एडरने 109व्या मिनिटाला जबरदस्त किक मारून पहिला गोल केला. एडरचा हा गोल सामन्यात निर्णायक ठरला. एडरच्या या गोलच्या जोरावर पोर्तुगाल टीमने फ्रान्सवर 1-0 ने विजय मिळवला.

दरम्यान, 2004 नंतर पहिल्यांदाच युरो कपच्या अंतिम सामन्यात पोहोचलेल्या पोर्तुगाल संघाने फ्रान्सचा 1-0 ने पराभव करीत इतिहास रचला. पोर्तुगालने पहिल्यांदाच युरो चषक जिंकला आहे. 2004 साली अंतिम सामन्यात पोहोचलेल्या पोर्तुगाल संघाला ग्रीसकडून 1-0 ने पराभव पत्कारावा लागला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2016 08:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close