S M L

रंगभूमीने केली महाराष्ट्र संस्कृती समृद्ध

6 एप्रिलमहाराष्ट्र राज्याचा सुवर्ण महोत्सव या वर्षी उत्साहात साजरा होत आहे. राज्याची सांस्कृतिक परंपरा मोठी आहे. या मातीतील कलांनी ही संस्कृती टिकवून ठेवली आहे. आणि यात मराठी रंगभूमीचे स्थान मोठे आहे.मराठी रंगभूमीची समृद्धी दिवसेंदिवस वाढतेच आहे. मराठी नाटकांनी प्रेक्षकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य केले. संगीत आणि नाट्याचा अनोखा मेळ साधत संगीत रंगभूमीने मराठी नाटकाची मुहूर्तमेढ रोवली. ही नाटके वन्स मोअरमुळे 6-7तास चालायची.प्रत्येक कलेत समाजाचे प्रतिबिंब हे दिसतेच. पारंपारीक संगीत नाटकात गुंतलेली मराठी रंगभूमीही याला अपवाद नव्हती. तेंडुलकरांचे घाशीराम कोतवाल याचे उत्तम उदाहरण. जात आणि धर्मात अडकलेल्या समाजावर त्यांनी या नाटकातून आसूड ओढले. त्यानंतर आलेले तेंडुलकरांचे प्रत्येक नाटक समाजाविषयी काहीतरी बोलत राहिले. अनेक धाडसी विषय त्यांनी त्यांच्या नाटकातून मांडले. आणि सुरुवातीला विरोध होऊनही नंतरच्या काळात प्रेक्षकांनी ते स्वीकारले. कारण अर्थातच प्रेक्षक बदलत होता. नव्या काळाप्रमाणे नवा प्रेक्षकही घडत होता.मराठी रंगभूमीला विनोदी नाटकांचीही मोठी परंपरा आहे. विनोद हा मराठी नाटकांमधील एक अविभाज्य भाग आहे. पण हा विनोद अनेकदा फक्त टाइमपाससाठी बनला नाही. त्यातूनही समाजाला काहीतरी सांगायचे होते. तो मी नव्हेच म्हणणारा लखोबा लोखंडे तुम्हाला माहीत असेलच. अनेक वर्षानंतरही या नाटकाची लोकप्रियता तेवढीच कायम आहे. अशा अनेक नाटकांतील वेगवेगळे प्रयोग मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले.प्रायोगिक नाटकांनी मराठी रंगभूमीला बरेच काही दिले. आख्खी नाट्य चळवळ या प्रायोगिक नाटकांवर उभी राहिली. या प्रायोगिक नाटकांमुळेच नाटक आणि सिनेमा क्षेत्राला बरेच मोठे कलाकार मिळाले. आविष्कार, पृथ्वी थिएटर, भावे थिएटर यांनी बरेच कलावंत घडवले . आणि याला जोड मिळाली आहे, एकांकिका स्पर्धांची. आयएनटी, विष्णुदास भावे, मृगजळ, सर्वसामान्यांतील कलाकार इथे गवसतो आणि मग नाट्यसृष्टी समृद्ध व्हायला लागते.बदलत्या काळाचे अनेक रंग उलगडताना इतिहासही तितक्याच आत्मीयतेने जपणारी आपली ही मराठी रंगभूमी. टीव्ही सिनेमासारख्या अनेक माध्यमांची आव्हाने पेलत आजही तेवढ्याच डौलाने उभी आहे. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीत या रंगभूमीचा वाटाही महत्त्वाचा आहे. मराठी संस्कृतीचा मानदंड बनलेल्या या रंगभूमीला आमचा मानाचा मुजरा.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 6, 2010 03:01 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 6, 2010 03:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close