S M L

मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळ वाहून गेल्यानं सुरत-नंदुरबार पॅसेंजर रुळावरून घसरली

Samruddha Bhambure | Updated On: Jul 11, 2016 11:34 AM IST

मुसळधार पावसामुळे रेल्वे रुळ वाहून गेल्यानं सुरत-नंदुरबार पॅसेंजर रुळावरून घसरली

11 जुलै : मुसळधार पावसामुळे रेल्वे ट्रॅक वाहून गेल्याने सुरत-नंदुरबार पॅसेंजर ट्रेन रुळावरून घसरली आहे. रात्री साडे अकरा वाजता ही दुर्घटना घडली असून सुदैवाने यात कुठलीही हानी झालेली नाहीये.

दोन दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात तुफान पाऊस सुरु आहे. या पावसामुळं पाचोराबारी स्टेशनजवळ रेल्वे रुळ वाहून गेले. अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. मात्र जळगाव- सूरत रेल्वे मार्ग ठप्प झाला आहे. तसंच, ओखा पुरी, प्रेरणा एक्सप्रेस आणि अन्य लोकल रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. घसरलेल्या गाडीतील प्रवाशांना नंदुरबारला सोडण्यासाठी 15 बसेसची व्यवस्था केली गेली आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2016 09:28 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close