S M L

मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळल्याप्रकरणी पंकजा मुंडेंच्या 8 समर्थकांवर गुन्हा दाखल

Samruddha Bhambure | Updated On: Jul 11, 2016 02:21 PM IST

pathardi231

11 जुलै : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धक्कातंत्राचा वापर करीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे जलसंधारण खातं राम शिंदे यांच्याकडे सोपवलं आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मुंडे समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं होतं. त्या सर्व 8 समर्थकांविरोधात जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

भाजपचे माजी युवक शहराध्यक्ष मुकुंद गर्जे, भाजपचे सोनोशी गावचे सरपंच गोकुळ दौंड , भाजपचे पंचायत समितीचे माजी सभापती संपत कीर्तने यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडे यांच्यासह विनोद तावडे यांच्याकडील एक खात काढून घेत त्यांना धक्का दिला होता. यावरून पंकजा यांनी ट्विटरवरून जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आज पाथर्डीमध्ये पंकजांच्या सर्थकांनी फडणवीसांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. या प्रकारामुळे राज्य सरकारमध्ये दोन गट पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2016 02:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close