S M L

दालन वाटप न झाल्याने पदभार स्वीकारायचा तरी कसा?, नवनियुक्त मंत्र्यांसमोर यक्षप्रश्न

Samruddha Bhambure | Updated On: Jul 11, 2016 02:41 PM IST

mantrimandal_vistar

11 जुलै :  राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन नव्याने आलेले मंत्री आज (सोमवारी) आपला पदभार स्वीकारणार आहेत. असं असलं तरीही सध्या त्यांच्यासाठी कार्यालय उपलब्ध नाही. त्याचबरोबर ज्या नविन 10 मंत्र्यांनी शपथ घेतलीये, त्यांना आपल्या बंगल्यासाठीही किमान 2 आठवडे प्रतिक्षा करावी लागणार आहे.

मंत्र्यांना बंगले आणि कार्यालये वाटप हे अधिकार पुर्णपणे मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित आहेत. पण मुख्यमंत्रीच सध्या परदेश दौर्‍यावर असल्यानं, हे वाटप लांबण्यची शक्यता आहे.

दरम्यान, रिक्त असलेले बंगले आणि कार्यालये शोधण्यासाठी नवनिर्वाचित मंत्री आणि त्यांच्या पीएंची धावाधाव सुरू आहे. पण जरीही एखादा बंगला किंवा कार्यालय आवडलं तरही त्यांना तेच मिळेल याची शाश्वती नाही. कारण कितीही इच्छा असली बंगला आणि कार्यालय वााटप करण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यामुळे कुठलं कार्यालय आणि बंगला मिळेल यासाठी मुख्यमंत्रींची परदेष दौर्‍यावरून परत येण्याची वाट पहावी लागणार आहे. त्यामुळं आज पदभार स्विकारायचा की नाही? आणि स्विकारला तर बसायचं कुठं? हा प्रश्न आता नविन मंत्र्यांपुढे उभा राहिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2016 10:44 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close