S M L

पंकजा मुंडेंना आणखी एक धक्का, 12 हजार कोटींचे कंत्राट कोर्टाने केले रद्द

Sachin Salve | Updated On: Jul 11, 2016 05:43 PM IST

पंकजा मुंडेंना आणखी एक धक्का, 12 हजार कोटींचे कंत्राट कोर्टाने केले रद्द

11 जुलै : दोन खाती गेल्यामुळे अस्वस्थ झालेल्या पंकजा मुंडे यांना आता मुंबई विद्यापीठाच्या औरंगाबाद खंडपीठाने चांगलाच धक्का दिलाय. महिला बालकल्याण विभागानं खासगी उद्योजकांना दिलेला 12 हजार कोटींचा पोषण आहाराचं कंत्राट मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं रद्द केलाय.

चिक्की घोटाळ्यात अवाच्या सव्वा कंत्राट दिल्याचा ठपका महिला आणि बालकल्य़ाण मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर झाला होता. आता  महिला बालकल्याण विभागानं खासगी उद्योजकांना दिलेला 12 हजार कोटींचा पोषण आहाराचं कंत्राट मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं रद्द केलंय.

पंकजा मुंडेंच्या महिला आणि बालकल्याण विभागानं हे कंत्राट दिलं होतं. हे कंत्राट रद्द करा, पुन्हा सर्व्हे करा आणि नव्यानं कंत्राट द्या असे स्पष्ट आदेश कोर्टाने दिले आहे.

आयबीएन लोकमतनं बचतगटांवर झालेल्या अन्यायाला सर्वात प्रथम वाचा फोडली होती. या प्रकरणी बचतगट कोर्टात गेले होते. टीएचआरचा ठेका बचतगटांना मिळू नये यासाठी मुद्दाम काही अटी टाकल्या होत्या. शिवाय कंत्राट देताना हायकोर्टाच्याच आदेशांची पायमल्ली केल्याचा आरोप बचत गटांनी केला होता. बचतगटांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन हायकोर्टानं हा ठेका रद्द करण्याचे आदेश दिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2016 05:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close