S M L

नादखुळा पावसामुळे कोल्हा'पूर'मय !

Sachin Salve | Updated On: Jul 11, 2016 06:44 PM IST

नादखुळा पावसामुळे कोल्हा'पूर'मय !

कोल्हापूर, 11 जुलै : जिल्ह्यात सलग तिसर्‍या दिवशीही मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्याच्या अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाच्या संततधारेनं नद्यांच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. तसंच पंचगंगा नदीही पात्राबाहेर पडली आहे.

जिल्ह्यात गेल्या 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 190.5 मि. मी. पावसाची नोंद झालीये. तर राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होवून धरणाची पाणीपातळी 4. 41 टीएमसीवर गेलीय. तर वारणा धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ होवूनन् 16. 50 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झालाय.

पंचगंगा नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून,राजाराम बंधार्‍यावरील पाणी पातळी 35 फूट 11 इंचावर गेलीये. त्याशिवाय पंचगंगा नदीवरील सात बंधारेही पाण्याखाली गेलेत. तसंच जिल्ह्यातील विविध नद्यांवरील 49 बंधारे पाण्याखाली गेले असून अनेक ठिकाणी 18 घरांचे नुकसान झाले आहे. बहुचर्चित कळंबा तलावही आता 45 टक्के भरलाय. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याच पहायला मिळतय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2016 06:44 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close