S M L

समीर गायकवाडला जामीन नाहीच !, जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Sachin Salve | Updated On: Jul 11, 2016 07:41 PM IST

11 जुलै : गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपी समीर गायकवाडचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला. या प्रकरणातला खटला अजून सुरू व्हायचा असल्यानं अनिश्चित काळासाठी समीर गायकवाडला तुरुंगात न ठेवता त्याला जामीन देण्यात यावा अशी मागणी गायकवाडचे वकील संजीव पुनाळेकर यांनी हायकोर्टासमोर केली होती.Sameer Gaikwad

या प्रकरणात साक्षीदार हा अल्पवयीन असल्यानं त्याची साक्ष ग्राह्य धरता येणार नाही अस् म्हणणं पुनाळेकर यांनी मांडलं, पण त्या साक्षीदारानं आरोपीला पाहिल्यावर आपल्या शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना त्याबद्दल सांगितलं होतं आणि त्याला ती घटना व्यवस्थित आठवत होती, याचाच अर्थ त्याची साक्ष ग्राह्य धरली जावी असं विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी म्हणणं मांडलं.

कोर्टाने देखील भारतीय पुरावे कायदा अंतर्गत अल्पवयीन व्यक्तीची साक्ष ग्राह्य धरली जाऊ शकते असं सांगितलं. समीर आणि इतर सनातनच्या इतर साधकांदरम्यान झालेलं संभाषण तसंच समीर जेलमधून बाहेर आल्यास इतर साक्षीदारांवर दबाव येऊ शकतो आणि समीर हा रुद्र गौडा पाटीलसारखा फरार होऊ शकतो हा सरकार वकीलांचा युक्तीवाद कोर्टाने ग्राह्य धरला. समीरचं पानसरे यांच्याशी कोणतंही वैयक्तिक वैर नसलं तरी वैचारिक मतभेदातून पूर्वनियोजित पद्धतीने ही हत्या करण्यात आली असल्याचं सांगत हायकोर्टाने समीरचा जामीन फेटाळला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2016 07:41 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close