S M L

बीडचे मुंडे बहिण-भाऊ अडचणीत

Sachin Salve | Updated On: Jul 11, 2016 10:53 PM IST

बीडचे मुंडे बहिण-भाऊ अडचणीत

11 जुलै : राज्याच्या राजकारणातं मानाचं स्थान असलेले बीडचे मुंडे बहिण भाऊ सध्या चांगलेच अडचणीत आले आहे. बीड जिल्हा बँक घोटाळ्यात बीड पोलिसांनी धनंजय मुंडेंना फरार घोषित तयारी चालवलीय. तर दुसरीकडे जलसंधारण खातं नाराज झालेल्या पंकजा मुंडे थेट पालन पोषण आहार योजनेतलं नियमबाह्‌य कंत्राट हायकोर्टाने रद्द केल्याने पुन्हा वादाच्या भोवर्‍यात सापडल्या आहेत. बीडचे मुंडे बहीण भाऊ नेमके कसे अडचणीत आलेत ते....

राज्यात राजकारणात सध्या बीडचे धनंजय मुंडे आणि बहीण पंकजा मुंडे चांगलेच अडचणीत आलेत. बीड जिल्हा बँक घोटाळ्यामुळे राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे पुरते अडचणीत आले आहे. बीड पोलिसांनी तर त्यांनी फरार आरोपी म्हणून घोषित करण्यासाठी हायकोर्टाकडे प्रस्ताव देखील पाठवलाय. तर दुसरीकडे बहिण पंकजा मुंडे यांच्याकडचं जलसंधारण खातं काढून मुख्यमंत्र्यांनी त्यांचं पंख छाटलेत.निषेध म्हणून त्यांच्या समर्थकांनी सीएमचा पुतळा जाळलाय खरा पण पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल करताच पंकजा मुंडेंना थेट फेसबुकवरूनच आपण नाराज नसल्याचा खुलासा करावा लागलाय.

थोडक्यात स्वतःला स्वर्गीय गोपीनाथ मुंडेंचे वारसदार म्हणवणारे हे दोन्ही बहिण भाऊ चांगलेत अडचणीत आले आहे. अशातच हे दोन्ही बहिण भावांमधून साधा विस्तवही जात नसल्यानेच या दोघांचेही ज्ञात अज्ञात विरोधक या संधीचा फायदा घेऊन नक्कीच त्यांना जेरीस आणणार यात शंका नाही.

त्यामुळे उद्या जर समजा या दोघांसमोरच्या अडचणी आणखी वाढल्या तर पंकजा मुंडेंचं मंत्रिपदही धोक्यात येऊ शकतं तर दुसरीकडे बीड जिल्हा बँक घोटाळ्यात अटकेची कारवाई झाली तर त्यांचंही विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येऊ शकतं. थोडक्यात काय तर गोपीनाथ मुंडेंच्या पाठीमागे परस्परांशी भांडत बसल्यानं हे मुंडे बहिण-भाऊ आपल्या हातानेच स्वतःच्या पायावर कुर्‍हाड मारून घेताना दिसताहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2016 10:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close