S M L

हॉकी कर्णधार सरदार सिंगची उचलबांगडी, ऑलिम्पिकचे नेतृत्व गोलरक्षक श्रीजेशकडे

Samruddha Bhambure | Updated On: Jul 12, 2016 08:21 PM IST

हॉकी कर्णधार सरदार सिंगची उचलबांगडी, ऑलिम्पिकचे नेतृत्व गोलरक्षक श्रीजेशकडे

12  जुलै :   पुढच्या महिन्यापासून होणार्‍या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय हॉकी टीमची आज (मंगळवारी) घोषणा करण्यात आली. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी निवड समितीने सरदार सिंह ऐवजी भारताचा दिग्गज गोलकीपर पी.आर.श्रीजेश याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. तर महिला हॉकी टीमच्या कर्णधारपदावरून रितू राणीला हटवण्यात आलं आहे. तिच्या ऐवजी टीमचं नेतृत्व सुशीला चूना हिच्याकडे देण्यात आलं आहे. तर दीपिकाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

श्रीजेश मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदरुस्त खेळाडू असून नुकत्याच लंडनमध्ये झालेल्या चॅम्पियन्स कप हॉकी स्पर्धेत त्याच्या नेतृत्वाखाली टीमने रौप्य पदक मिळवलं होतं. त्यामुळेच त्याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. हॉकी इंडियाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली. ऑलिम्पिकसाठी भारतीय संघात चार डिफेंडर, सहा फॉरवर्ड आणि सहा मिडफिल्डरांचा समावेश करण्यात आला आहे. दुखापतीमुळे डिफेंडर बिरेंदर लाकडा याच्या ऐवजी सुरेंदर कुमारचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.

सरदार सिंहचा संघात समावेश करण्यात आला असला तरी त्याच्याकडे कर्णधारपद असणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून सरदार टीम इंडियाचे नेतृत्व करत आहे. 2012मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत त्यानेच भारतीय संघाचे नेतृत्व केलं होतं. चॅम्पियन स्पर्धेनंतर स्पेनमधील वालेन्सियामध्ये झालेल्या हॉकी स्पर्धेत सरदारच्या नेतृत्वाखाली टीमला केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 12, 2016 08:21 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close