S M L

नात्याला काळीमा, पतीच्या मदतीने भावोजीचा पत्नीवर बलात्कार

Sachin Salve | Updated On: Jul 13, 2016 03:11 PM IST

नात्याला काळीमा, पतीच्या मदतीने भावोजीचा पत्नीवर बलात्कार

पालघर, 13 जुलै : पती-पत्नीच्या विश्वासाला काळीमा फासणारी घटना पालघर जिल्हयातील बोईसर येथे घडली आहे. एका नवविवाहितेवर तिच्या पतीच्या बहिणीच्या नवर्‍यानं बलात्कार केला. तिनं जेव्हा याबद्दल पतीला सांगितलं, तेव्हा तिच्या नराधम पतीनं पुन्हा त्याच्या भावोजीला तिच्यावर बलात्कार करायला सांगितला. आणि या गंभीर आणि घृणास्पद गुन्ह्यात भावोजीची मदतही केली. सध्या दोघांनाही बोईसर पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत.

लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी पतीच्या बहिणीच्या नवर्‍यांने राञी दीड वाजता पीडित महिलेवर बलात्कार केला. बलात्काराची घटना आपल्या पतीला सांगितल्यावर पतीने तर कहरच केला. भावोजीने बलात्कार कसा केला ते बघण्यासाठी तिच्यावर पुन्हा भावोजीकरवी बलात्कार करवून घेतला. यावेळी त्यांने पुन्हा राञी दीडची वेळ निवडली आणि तिचे कपडे काढून, तिचं तोंड दाबून, भावोजीला पुन्हा बलात्कार करण्यास सांगितलं. पीडित तरुणीने दुसर्‍या दिवशी लग्न लावणाऱअया मौलानाकडे गेली. मौलानाने तिला बोईसर पोलीस ठाण्यात नऊन, दोघांवर गुन्हा नोंदवला.

पीडित मुलगी अत्यंत गरीब घरची आहे. मौलानाने तिचं लग्न लावून दिलं होतं. 7 जुलै 2016 ला तिचं लग्न लागलं. आणि 8 जुलै 2016 ला पतीच्या भावोजीने तिच्यावर बलात्कार केला. आणि पुन्हा 9 जुलै 2016 रोजी नवर्‍याने भावजीकरवी आपल्या डोळ्यासमोर आपल्याच पत्नीवर बलात्कार करू दिला. बोईसर पोलिसांनी भावोजी आणि पतीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पालघर न्यायालयानं या दोघांना 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2016 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close