S M L

शेतकर्‍यांची 'आडत'मधून सुटका, एपीएमसीचा संप मागे

Sachin Salve | Updated On: Jul 13, 2016 07:01 PM IST

शेतकर्‍यांची 'आडत'मधून सुटका, एपीएमसीचा संप मागे

मुंबई, 13 जुलै : गेल्या काही दिवसांपासून सर्वसामान्य जनता आणि शेतकर्‍यांना वेठीस धरणार्‍या एपीएमसीचा संप अखेर मागे घेण्यात आला. राज्य सरकारच्या भाजीपाला संपूर्ण नियंत्रणमुक्त निर्णयाची अंमलबाजवणी करण्याची ग्वाही एपीएमसीच्या व्यापार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे यापुढे शेतकर्‍यांकडे आडत न घेण्याचा निर्णय एपीएमसीने घेतलाय. मात्र, नाशिकच्या बाजार समितीने संप मागे घेण्यास नकार दिलाय.

राज्य सरकारने शेतकर्‍यांना शेतमाल विकण्यास बाजार मोकळे केल्यामुळे व्यापार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले होते. त्यामुळे मुंबईतील एपीएमसीने संपाचे हत्यार उपसले. त्यामुळे बाजारापेठेत आवाक चांगलीच कमी झाली. शेतमालच बाजारात उपलब्ध नसल्यामुळे भाज्यांचे भाव चांगलेच कडाडले होते. एवढंच नाहीतर राज्य सरकारने व्यापार्‍यांवर थेट कारवाई करण्याची तयारी सुरू केली होती.

काही व्यापार्‍यांना नोटीसाही बजावण्यात आल्यात.

आज सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख आणि एपीएमसीच्या व्यापार्‍यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतरबाजार समित्यातील संप व्यापार्‍यांनी मागे घेतला. या बैठकीत बाजार समिती सक्षम राहिल्या पाहिजेत यावर चर्चा झाली. राज्य सरकारच्या भाजीपाला संपूर्ण नियंत्रणमुक्त निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल आणि यासाठी शेतक र्‍यांकडून व्यापारी आडत घेणार नाहीत अशी ग्वाही व्यापार्‍यांनी दिली. तसंच जो सहकार्य करणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाईल. लवकरच समान व्यापारी कायदा लागू करण्यात येईल आणि 6 ऑगस्टपर्यंत नवीन सुधारणा केल्या जातील अशी माहितीही सुभाष देशमुख यांनी दिली. या बैठकीनंतरही मुंबई एपीएमसीने संप मागे घेतलाय. पण नाशिकचा संप मात्र सुरूच आहे. नाशिकच्या व्यापार्‍यांनी संप मागे घ्यावा असं आवाहन देशमुख यांनी केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 13, 2016 07:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close