S M L

26/11 च्या हल्ल्यात डॉनचा हात

7 एप्रिलमुंबईवर झालेल्या 26/11 च्या हल्ल्यात लष्कर ए तोयबाला दाऊद कंपनीने लॉजिस्टिक सपोर्ट पुरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.अमेरिकेने दिलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. स्ट्रॅटेजिक इन्स्टिट्यूट ऑफ यू.एस.आर्मी वॉर कॉलेजच्या डिफेन्स डिपार्टमेंटने हा अहवाल प्रकाशित केला आहे. पाकिस्तानमधील आपल्या वास्तव्याच्या बदल्यात दाऊद हा आयएसआय समर्थित लष्कर ए तोयबा सारख्या इस्लामिक संघटनांना पैसा पुरवतो. 1993 ,94 पासून दाऊदच्या या कारवाया सुरू आहेत. जम्मू काश्मिर इस्लामिक फ्रंटच्या नेत्यांसोबत मुजफ्फराबाद इथे टायगर मेननचे फोटो प्रसिद्ध झाले होते. आणि तेंव्हाच काश्मिरमध्ये कसा मनी माफिया चालतो हे सिद्ध झाले, असे या अहवालात स्पष्ट म्हटले आहे.डी कंपनीने आपले पाय आता सौदी अरेबियापर्यंत पसरल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना जी भारतातील 60 टक्के दहशतवादाला जबाबदार आहे तिला आयएसआय आणि दाऊदकडून मदत होत आहे. दाऊद इब्राहिमचा भाऊ अनिस याने लष्कर ए तोयबाची मदतीची ऑफर स्वीकारली. लष्करला पूर्व आफ्रिकेमध्ये आपले पाय पसरायचे आहेत. त्यासाठी अनिसने पूर्व आफ्रिकेमध्ये जहाजांच्या व्यवसायात गुंतवणूक केली असल्याचेही या 117 पानी अहवालात म्हटले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Apr 7, 2010 09:50 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 7, 2010 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close