S M L

आषाढी वारीसाठी रेल्वेच्या 126 पंढरपूर स्पेशल ट्रेन

Sachin Salve | Updated On: Jul 14, 2016 02:05 PM IST

आषाढी वारीसाठी रेल्वेच्या 126 पंढरपूर स्पेशल ट्रेन

पंढरपूर, 14 जुलै : आषाढी वारी सोहळ्यासाठी रेल्वेनं भाविकांसाठी विशेष व्यवस्था केलीये. मध्य रेल्वेनं आषाढी वारी सोहळ्यासाठी तब्बल 126 रेल्वे गाड्या सोडल्यात. गेल्या वर्षीच्या तुलनेत गाड्यांची संख्या 26 ने वाढवण्यात आलीये. वारकर्‍यांना अल्पदरात वारी करता यावी यासाठी रेल्वेनं विशेष खबरदारी घेतलीये. गेल्यावर्षी पावणेदोन लाख वारकर्‍यांनी रेल्वेनं प्रवास केला होता. यंदा ही संख्या वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय.

आषाढी वारीचे सर्वच प्रशासकीय यंत्रांना वेध लागले आहेत त्यात रेल्वे विभागही आघाडीवर आहे. गतवर्षी पेक्षा यावर्षी 26 गाड्या वाढवण्यात आल्या असून राज्यभरातील वारकर्‍यांना पंढरीची वारी अल्पदरात आणि सुलभतेने व्हावी यासाठी 126 गाड्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय अधिक मागणी असल्यास स्वतंत्र गाडी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

केवळ गाड्यांचे नियोजन न करता आलेल्या प्रवाशांना आवश्यक त्या मुलभूत सेवा सुविधा देण्यासाठी राज्यभरातून अधिकारी आणि कर्मचार्‍यांना पाचारण करण्यात आले आहे. गतवर्षी 98 गाड्यांमधून 1 लाख 72 हजार वारकरी भाविकांनी रेल्वेचा लाभ घेतला होता. यावर्षी दोन लाखाहून अधिक भाविक रेल्वेने प्रवास करतील असे अपेक्षित आहे. दरम्यान भुसावळहून पंढरपूरला एक यात्रा स्पेशल गाडी मोफत सोडण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2016 02:05 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close