S M L

एपीएमसीमध्ये 'आडत'णूक नाट्यानंतर 1300 टन भाजीपाला दाखल

Sachin Salve | Updated On: Jul 14, 2016 02:55 PM IST

एपीएमसीमध्ये 'आडत'णूक नाट्यानंतर 1300 टन भाजीपाला दाखल

नवी मुंबई 14 जुलै : राज्य सरकार आणि एपीएमसीच्या घाऊक व्यापार्‍यांच्या कालच्या बैठकीनंतर आजपासून नवी मुंबईतील एपीएमसी बाजारपेठेत शेतकर्‍यांचा भाजीपाला आला. आडत न घेण्याच्या अटीवर संप मागे घेतला खरा पण सरकारच्या निर्णयाप्रमाणेच आज आठ टक्के आडतही किरकोळ व्यापार्‍यांकडून वसूल केली गेली. याला विरोध करत आज किरकोळ व्यापार्‍यांनी भाजीपाला खरेदीवर बहिष्कार टाकला होता. मात्र येत्या शनिवारी 8 टक्के आडत वसुलीवर बैठक घेवून तोडगा काढू सध्यातरी कोणाकडूनही आडत वसूल केली जाणार नसल्याचा निर्णय घाऊक व्यापार्‍यांनी घेतल्याने नवी मुंबईच्या एपीएमसी बाजारपेठेत आलेल्या 500 गाड्यांमधील 1300 टन भाजीपाला मुंबईत दाखल झाला.

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत किरकोळ व्यापार्‍यांकडून सुरुवातीला आठ टक्के आडत वसुली करण्यात आली. पण व्यापार्‍यांनी आडत न भरता भाजीपाला खरेदीवर बहिष्कार टाकला. आडत कोण भरणार यावरुन वाद झाल्यानं काही काळ बाजार समितीतला व्यवहार काही काळ ठप्प झाले होते. शेवटी किरकोळ आणि घाऊक व्यापारी अशा दोघांकडून आडत न घेता शेतमाल खरेदीचा व्यवहार सुरू करण्यात आलाय. आडत कोण भरणार यावर शनिवारी बाजार समितीतल्या व्यापार्‍यांची बैठक होणार आहे. या बैठकीत काय निर्णय होणार याकडं सगळ्याचं लक्ष लागलंय. संप मिटल्यानंतर आज 500 गाड्यांमधून 1300 टन भाजीपाला नवी मुंबईत दाखल झालाय. या पाचशे गाड्यांपैकी 300 गाड्या भाजीपाला मुंबई शहरात दाखल झालाय.

आवाक वाढली

नवी मुंबईतल्या एपीएमसी बाजार पेठेत आज कांदा बटाट्याची विक्रमी आवक झालीये. दररोज साधारण 150 गाड्या कांदा-बटाट्याची आवक होत असते. मात्र आज ही आवक 300 गाड्यांवर पोहोचलीय. यामध्ये 179 गाड्या कांदा तर 111 गाड्या बटाट्याची आवक झालीय. ही आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे कांदा बटाटा मार्केटमध्ये 8 टक्के आडत वसुली वरून कोणताही वाद

झालेला नाही. 8 टक्के आडत ही किरकोळ व्यापार्‍यांकडून वसूल करण्यात आलीये. यामुळे कांदा बटाटा सुरूळीतपणे मुंबईत दाखल झालाय.

भाज्याचे दर उतरले

आज एपीएमसीतील व्यापार्‍यांनी बंद मागे घेतल्यामुळे भाज्यांचे भाव किरकोळ बाजारात तुलनेने कमी झाले आहेत. दोन दिवस सुरू असलेल्या संपामुळे भाजीपाला प्रत्यक्ष बाजारात कमी प्रमाणात पोहचत होता. त्यामुळे भाज्यांचे दर चढे होते. आज भाव तुलनेने कमी झाल्यामुळे ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळतोय. त्यामुळे ग्राहकांकडूनही समाधान व्यक्त करण्यात येतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 14, 2016 02:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close